मराठी बेस्ट भजन लिरिक्स

मराठी बेस्ट भजन लिरिक्स

वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स – Wache Vitthal Gayin Lyrics

वाचे विठ्ठल गाईन
नाचत नाचत पंढरी जाईन…॥धृ॥
वाचे विठ्ठल गाईन …

ऐसे आहे माझ्या मनी
लोळेन संतांच्या रजकणी…॥1॥
वाचे विठ्ठल गाईन …

रंग लावीन अंतरंगी
भरूनी देहभाव सारा…॥2॥
वाचे विठ्ठल गाईन ………..

तुकड्या म्हणे होईन मी दास
देवा पुरवा ईतूकी आस…॥3॥
वाचे विठ्ठल गाईन ……..

विठ्ठल आवडी प्रेमभावो लिरिक्स – Vitthal Awadi Prem Bhav lyrics

विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल नामाचा रे टाहो

विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥
तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥२॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो

म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥३॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो

नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो

चल ग सखे चल ग सखे पंढरीला लिरिक्स – Chal Ga Sakhe Pandharila abhang Lyrics

पुंडलिकवर्देवं हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल

तू ध्यानी जरा ठेव हो हो हो
तू ध्यानी जरा जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल

चंद्रभागा नदीतीरावर
विठ्ठल विठ्ठल
मंदिर विठ्ठलाचे सुंदर
विठ्ठल विठ्ठल
देव आहे उभा विटेवर
विठ्ठल विठ्ठल
ठेउनी दोन्ही कर कटेवर
विठ्ठल विठ्ठल

ते पाहू त्यांचे रूप हो हो हो
ते पाहू त्यांचे रूप लावू ऊद आणि धूप
करु वंदन प्रभूच्या मूर्तीला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स – Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics

गण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना

तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा …..

ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग

मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..

विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल

नाम तुझे रे नारायणा अभंग लिरिक्स – Naam Tuze Re Narayana Abhang Lyrics

नाम तुझे रे नाम तुझे रे
नाम तुझे रे नारायणा

फोड़ी पाषाणाला पान्हा
नाम तुझे रे नारायणा।। धृ ।।
नाम तुझे रे नारायणा

नाम जपले वाल्मिकाने,
फुटले दोन त्याला पाने ।। 1 ।।
नाम तुझे रे नारायणा

आला मेला पापरासी,
तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
नाम तुझे रे नारायणा

ऎसा नामाचा महिमा,
तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
नाम तुझे रे नारायणा

नाम तुझे घेता देवा होई समाधान लिरिक्स – Naam Tujhe Gheta Dewa Hoyi Samadhan Lyrics

नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान

सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ़ ज्ञान
कल्गातिचे फिरविशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान

काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई
आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी
आहे तुज अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान

बंधू माय बापा लागे आस दर्शनाची
दत्ता मन्हे ऐका नाथा हाक पामराशी
अल्प बुद्धि माझी देवा भक्त मी रे सान
नाम तुझे घेता देवा होई समाधान

देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics

जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..

चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे बाळ तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाळ तुझं
तुझ्याईना संसार यो
कडूझार सारा
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स – Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics

तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला,
धीर नही वाटे देवा माझ्या मनला ,
काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे ,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,

तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा ,
नही देव पावलो मी झालो अभागा ,
आता तरी देवा माला एक वेळा पाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,

प्रल्हदा कारने नरसिंह झाला ,
.दृष्ट मारन्यला देवा भक्त तारन्यला,
भक्त उद्धरिसी देवा जगी तुझे नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,

गोर्ह्या कुम्भाराची आइकून विनावनी,
भक्त एक़नाथा घरी वाहतो पानी,
म्हने दास तूकड्या देवा रूप तुझे दाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,

गोड तुझे रूप गोड तुझे नाम लिरिक्स – God Tuze Rup God Tuze Naam Lyrics

देई मज प्रेम सर्वकाळ
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाई चा पती सोयरिया ||
गोड तुझे रूप…

विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
गोड तुझे रूप…

तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
गोड तुझे रूप…

मराठी बेस्ट भजन लिरिक्स

Leave a Reply