मराठी लिरिक्स बेस्ट भजन

bhajan Lyrics Bhakti- bhakti.lyrics-in-hindi.com

मराठी लिरिक्स बेस्ट भजन

चंद्रभागेच्यातीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी लिरिक्स – Chandrabhagechya Tiri Ubha Mandiri To Paha Vitevari Lyrics

Song: Chandra Bhagechya Tiri
Album: Paule Chalati Pandharichi Vaat
Artist: Prahlad Shinde, chorus
Lyricist: Datta Patil

चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी

जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी

नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला
टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी

संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई
रखुमाई मंदिरी, एकली परि, तो पहा विटेवरी

माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स – Majhe Maher Pandhari Abhang lyrics

माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी

बाप आणि आई,
माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी …

पुंडलीक राहे बंधू,
त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी …

माझी बहीण चंद्रभागा,
करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी …

एका जनार्दनी शरण,
करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी …

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स – Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics

एकतारी संगे एक रूप झालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥

गळामाळ शोभे आत्मरूप शांती,
भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती ।
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

भुकभाकरीची छाया झोपडीची
निवार्‍यास द्यावी उब गोदडीची ।
माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला
कुणी राव होई कुणी रंक झाला ।
मागणे न काही सांगण्यास आलो ॥ ॥३॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

एकतारी संगे एक रूप झालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ||

Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics Marathi
Song : Ektari Sange Ekroop Jhalo
Singer : Sau.Dhepetai
Music : Dashrath Pujari
Lyrics : Ramesh Anavkar

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स – Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स – Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics

मागतो मी पांडुरंगा
फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे
मन हे अजाण
तरुणपणी संसारात
गेले सर्व ध्यान
गेले सर्व ध्यान
वृद्धपण येता आली जागती महान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

पतितांना पावन करते
दया तुझी थोर,
भीक मागतो मी चरणी,
अपराधी घो…र,
अपराधी घो…र
क्षमा करी बा विठ्ठला
अंगी नाही त्राण
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान

मागतो मी पांडुरंगा
फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे
द्यावे मज ज्ञान

नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स – Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics

नाही रे…..नाही कुणाचे कोणी
नाही रे ….नाही कुणाचे कोणी

बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा
कोण कोणाचे सगे सोयरे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे ….नाही कुणाचे कोणी

दोन दिवसाची तुझी जवानी
पुढे नाही टिकणार रे
मेल्या मागे सर्व राहिले
तुटतील धागे दोरे
नाही रे ….नाही कुणाचे कोणी

मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics

मी तुझ्यासाठी जिवण जाळीले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

मेल्या वरती रडतो कशाला
उगीच तान नको देऊ घश्याला
नको दिखावा दाखउ जगाला
पुरला नाही कधी रुपया दुधाला
मी तुला पाहूनी डोळे लाविले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

माझ्या कुशितला असुनी तू बाळ
माझ्या जिवाचा तू बनला तू काळ
तुझ जीवनभर पुरविले लाळ
राहुनी अर्धपोटी साँझ सकाळ
मी तुला पाहूनी प्राण रोखीले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

जिवंत पनि पुसले नाही
आता कशाला मनतोस आई
आणली नाही कधी खान्या मिठाई
डॉक्टर गोळी नाहीं कसली दवाई
मी तुला पाहूनी प्राण जाळी ले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

जिवंत पनि पुसले नाही
आता कशाला मनतोस आई
आता तुझ्याशी कोणन बोले
शेवटी अंघठयाने पानी मी प्याले
जग दिश्या तुम्हानी मानिले
रे बाळा तुन नाही पानी पाजिले

आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स – Aata Tari Dewa Mala Pawshil Ka Lyrics

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

पैसा तो अन्यायाचा करी खळबळ
दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ
न्यायासाठी मदतीला धावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

चोरी करून चोर दूर पळतो
संशयाने गरिबाला मार मिळतो
लाच घेती त्यांना आळा घालशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

दिले निवडून जरी आमुचे गडी
जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी
भलं आमचं करण्याला सांगशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

आता तरी देवा मला पावशील का
सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का

कानडा राजा पंढरीचा लिरिक्स – Kanada Raja Pandharicha Lyrics

कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला
अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा

परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स – Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

हेंचि दान देगा देवा लिरिक्स – Hechi Dan Dega Dewa Lyrics

हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
तुझा विसर न व्हावा…..

न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुझा विसर न व्हावा…..

तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥
तुझा विसर न व्हावा…..

मराठी लिरिक्स बेस्ट भजन

Leave a Reply