bhajans hindi Marathi lyrics

bhajans hindi Marathi lyrics

तुझे रूप चित्ती राहो लिरिक्स – Tujhe Roop Chitti Raho Lyrics

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम

तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं

माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics

माय आळंदी बाप पंढरी अभंग
माय आळंदी बाप पंढरी
देव भेटले पुंडलिका च्या घरी

कुकुट स्वामी च्या गोद घेतला त्याने
आई बापाच्या सेवेला नेमाने
देव गुणी गर्वला लागला मार्ग ला
माय आळंदी बाप पंढरी….

माय बापाला जो कोणी साम्भाड़े
सात जन्मी पापाची होई होड़ी
देव झाला सखा भक्ति चा भूखा
माय आळंदी बाप पंढरी….

पुंडलिका ने भक्ति तिथे केलि
लाज भक्ताची देव तू राखिली
उभा विठेवरी त्या वैकुंठा पूरी
माय आळंदी बाप पंढरी….

माय आळंदी बाप पंढरी
देव भेटले पुंडलिका च्या घरी

आलो शरण तुला भगवंता लिरिक्स – Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics

पेटून उठला वनवा सारा
तिन्ही जगाला लागली आग
नसे आसरा नाहीं निवारा
जाऊ कुठे मी सांग विट्ठला
जाऊ कुठे मी सांग

आलो शरण तुला भगवंता
घेई कुशीत तुझ्या भगवंता

पूण्य झाले स्वस्थ जगी
त्याला नाहीं भाव
पुण्यवान होई रंक
पापी झाला राम
नाही थारा इथ गुणवंता
आलो शरण तुला भगवंता

सत्यवान सावित्री चा
संपला जमाना
वैश्या करी चारित्रयाचा
खोट च बहाना
झाली दिन वाणी पतिव्रता
आलो शरण तुला भगवंता

कुम्पंच खायी शेत
त्याला नाहीं लाज
घरचा च रखवाला
वैरी झाला आज
देई आसरा दिन वन्ता
आलो शरण तुला भगवंता

नामाचा गजर गर्जे भीमातीर लिरिक्स – Namacha Gajar Garje Bhima Tir Lyrics

नामाचा गजर गर्जे भीमातीर ।
महिमा साजे थोर तुज एका

रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती ।
उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी

चारी वेद भाट होऊनि गर्जती ।
सनकादिक गाती कीर्ति तुझी

सुरवरांचे भार अंगणीं लोळती ।
चरणरज क्षिति शीव वंदी

नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू ।
करि तो सांभाळू अनाथांचा

सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लिरिक्स – Sonyach Bashing Lagin Devach Lyrics

या पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत…. || धृ ||

राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर
लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती … || १ ||

राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत…. || २ ||

नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला
चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ….. || ३ ||

bhajans hindi Marathi lyrics

This Post Has One Comment

Leave a Reply