bhajans Marathi lyrics

bhajans Marathi lyrics bhajans Marathi lyrics बेस्ट भजन मराठी लिरिक्स मराठी लिरिक्स

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स – Kadhi Lagel Re vedya Tula Godi Abhanga Chi Lyrics

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघुन घे साऊली मुर्ती आता त्या पांडुरंगाची

तुझा ना भरोसा आ… आ… आ…
न माझा भरोसा
जग हे कोणाचे सांग भल्या माणसा

असो चुल माती आणि मीठ भाकर
नाम हरीचे मुखी गोड साखर

सोडून दे रे धनाच्या तु लालसा
जग हे कोणाचे सांग भल्या माणसा ||

कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघुन घे साऊली मुर्ती आता त्या पांडुरंगाची || धृ ||

मनोभावे भजन कर तु प्रभुच्या लाग चरणाला
करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || १ ||

असे हा जन्ममोलाचा नको तु घालवू वाया
हे सदा गारे भुपाळी तु सकाळी त्या श्रीरंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || २ ||

धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्ग नेकीचा
जपून तु चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || ३ ||

मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जगभर तू वेड्या
तुला जाणीव रे होईल
आलेया घोर प्रसंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || ४ ||

|| आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ||

दर्शन दे रे दे रे भगवंता लिरिक्स – Darshan De Re De Re Bhagwanta Lyrics

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता
दर्शन दे रे…..

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्‍याकुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता
दर्शन दे रे…..

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता
दर्शन दे रे…..

तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता
मन शांत होई, तुझे गुण गाता
हिच एक आशा, पुरवी तू आता
दर्शन दे रे…..

अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी लिरिक्स -Agad Dhum Nagara Sonyachi Jejuri Lyrics

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा,
जय देवा जय शिव मार्तंडा…
देवा, जय देवा, जय देवा, जय देवा,
जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी,
देव गेले जेजुरा निळा घोडा…
अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा…

पाव मे तोडा… कमरी करगोटा,
बेंबी हिर, मस्तकी तुरा…

खोबर्‍याचा कुटका.. भंडार्‍याचा भडका
बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…

देवा, जय देवा, जय देवा, जय देवा,
जय देवा जय शिव मार्तंडा…
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार

कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स – Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics

कशाला काशी जातो रे बाबा !
कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।

संत सांगती ते ऐकत नाही,
इंद्रियाचे ऐकतो ।
कीर्तनी मान डोलवितो परी,
कोंबडी,बकरी खातो !।१।

वडील जनाचे श्राध्द कराया,
गंगे मध्ये पिंड देतो ।
खोटा व्यापार जरा ना सोडी,
देव कसा पावतो ।।२।।

खांदी पताका,तुळसी गुळ्यामधे,
घडी-घडी टाळ वाजवतो ।
गरीब-जनांची दया ना चित्ती,
दानासी हात आवरतो ! ।।३।।

झालेले मागे पाप धुवाया,
गंगेत धावुनी न्हातो ।
तुकड्या म्हणे,सत्य-आचरण वाचोनी,
कोणीच ना मुक्त होतो ।।४।।

देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स – Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics

हे देवा तू सांग ना कुठ
गेला हरवुनी
लेकराची आन तुला
आवतर आता तरी

अंधारल्या दाही दिश्या
अन बेजारल मन
उर जळून निघाल
बघ करपल मन

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रीत तुझ्या दावन्याल
माझा काय र गुन्हा

उरा मंधि जाळ पेटला
जन्माची राख झाली रं
ईस्कटलेली दिशा ही
धुरामंदी वाट गेली र

जिनी धुळीवाणी झालं
नेल्ह वार्‍याने उडून
अवकाळी वादळत
जीव लपेटून गेलं

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
माझा काय र गुन्हा

काळजावर घाव घातला
जिवारी गेला तडा र
निखार्याची वाट दिली तू
पायतान न्हायी पाई र

कुठं ठेऊ मी र माथा
दैव झाला माझा खुळा
असं कसं माय बाप
तू र बेफिकिरी झाला

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
काय र गुन्हा

हे देवा तू सांगण
कुठ गेला हरवुनी
लेकरची आन तुला
आवतर आत तरी

अंधाराल्य दाही दिश्या
आन बेजराल मन
उर जाळून निघालं
बघ करपल मन

आता तरी बघ देवा
उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावन्याल
माझाकाय र गुन्हा

bhajans Marathi lyrics बेस्ट भजन मराठी लिरिक्स मराठी लिरिक्स

Latest bhajans and lyrics in hindi songs and lyrics collections

Durga Ji Bhajan Lyrics

This Post Has One Comment

Leave a Reply