dateraye dhun

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

अनुसया अत्री सुकुमारा । दत्त दयाघन दयावरा ॥
पद्म कमंडलू गधा धारा । त्रिशूल हे शोभे करा ॥
षढवीत आयुढ परी करा । पूर्णानंदा अवतारा ॥
सुभस्मा रुद्राक्षा भरणा । भव भय दु:ख निवारणा ॥
काश्यायांबर वसन धारा । श्री मेघ श्याम सुंदरा ॥
अवधूता हे गिरीवारा । ओझे तेजो द्वीतीधारा ॥
षडभूज मूर्ती वीरा जीता । विश्वरूप हे विश्वंभरा ॥
भक्त प्रिय वज्रपंजरा । दिनांचा उद्धार करा ॥
दत्तात्रया अवतारा । श्रीपाद नरसिंहवरा ॥
नित्य निरंजन ओमकारा । कलयुगी ऐशी आकारा ॥
जन्म घेशी तु पिठापुरा । सचित धन तु शुभम करा ॥
शाश्वत पावन तपोवरा । शब्द दाविसी ओमकारा ॥
कृष्ण संगमी दरूवरा । नित्य वसे औदुंबरा ॥
विप्ररूप वेराग्य वरा । प्रियजन हे परमेश्वरा ॥
हे मुनिजन मानसचंद्रा । तु गुरु धैर्य समुद्रा
जगधीशा जगत उद्धारा । उद्धरी मज गुरुवरा ॥
करुणानिधी करुणाकारा । निर्गुण हे निर्विकारा ॥
गुरुराया कल्याण करा । निजा नंदी द्रुड करा ॥
चिन्मय चीतघन चीतंबरा । अंतर योगी अगोचरा ॥
ब्रम्हा विष्णू महेश्वरा । स्वामी समर्था कृपा करा ॥

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

Leave a Reply