saang radhe kuna sang hasli

सांग सांग सांग राधे सांग ना ग
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

घागर घेउन पानियाशी जाता
पानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता
पानियाशी गं यमुनेशी गं
अग हसली….
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

दही दूध घेउन बाजाराला जाता
बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता
बाजाराला गं मथुरेला गं
अग हसली…
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

एका जनार्धनी राधा गौळण
गौळण गेली कृष्णा ला शरण
नव्या युगाची नवरी नटली ग
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

Leave a Reply