Vitthalache Abhang Marathi lyrics
विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स – Vitthalache Abhang Marathi lyrics
विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स
विसरू नको रे आई बापाला लिरिक्स – Visru Nako Re Aai Bapala Lyrics
विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया
काया झिजउन तुझा शिरावर पडली सुखाची छाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया
तुझ मिडेल बायको पोर गणगोत्र मित्र परिवार
स्वार्था ने गुरमटलेला हा मायेचा बाजार
जीवना मधली अमोल संधि नको घालवू वाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया
आई बाप जिवंत अस्ता तू नाहीं केलि सेवा
अन मेल्यावर्ती कश्याला मनतोस देवा देवा
बूंदी लाडूच्या पंगती बसवती नंतर तू जेवाया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया
स्वामी ह्या तिन्ही जगाचा आई बिना भिकारी
समजुन उमजुन वेडया तू होऊ नको अविचारी
सोपनाचे बोल ध्यानी घे अज्ञान हे वर काया
रे वेडया मिडनार नाही तुला आईबापाची माया
अभंग बेस्ट भजन
अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स – Abir Gulal Udhalit Rang lyrics
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,
पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
धरिला पंढरीचा चोर लिरिक्स – Dharila Pandharicha Chor Lyrics
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..
सोहम शब्दांचा मारा केला
विट्ठल कौकोड़ी ला आला
जनि मने का विट्ठला
जिवे न सोडी मी रे तूला
धरिला पंढरीचा चोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
गड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोर
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ लिरिक्स – Naam Vitthal Vitthal Gheu Lyrics
चला मंगळ वेढे पाहू …(2)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)….||धृ.||
वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ…(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||१||
भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी…
आदराने सुमने वाहू…(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….(३)…||२||
कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी…
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ…(२)
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ…(३)…||३||
उभा कसा राहीला विटेवरी लिरिक्स – Ubha Kasa Rahila Vitewari Lyrics
विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे….
विठूराय कितीसे दूर….
इमानदारांच्या समीप अन्…..
बैमानापासून दूर….
पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला…..(2)
उभा कसा राहीला विटेवरी…..(3)…..||धृ.||
अंगी शोभे पितांबर पिवळा….
गळ्यामध्ये वैजयंती माळा…..
चंदनाचा टिळा माथी शोभला….(2)
उभा कसा राहीला विटेवरी…..(3)……||1||
चला चला पंढरीला जाऊ….
डोळे भरूनी विठू माऊलीला पाहू….
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला…..(2)
उभा कसा राहीला विटेवरी…..(3)…..||2||
ठेवूनिया दोन्ही करकटी….
उभा हा मुकूंद वाळवंटी…..
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला…..(2)
उभा कसा राहीला विटेवरी…..(3)…..||3||
बाळ श्रावण प्रार्थी आता….
नका दूर लोटू पंढरीनाथा….
तव चरणी हा देह सारा वाहिला….(2)
उभा कसा राहीला विटेवरी…..(3)…..||4||
पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला…..(2)
उभा कसा राहीला विटेवरी…..(3)
एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स – Ek Veda Kari Ya Dukha Vegade Lyircs
एक वेळा करी या दु:खा वेगळे
दुरिताचे जाळे ऊगओनि
आठवीण पाय हा माझा नवस
रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस
बहु दुरवरी भोगविले भोग
आता पान्डुरंगा सोडवावे
आठवीण पाय हा माझा नवस
तुकाम्हणे काय करिन कुरवंडी
वोवाळुनी सान्डी मस्तक हे
आठवीण पाय हा माझा नवस
रात्री हि दिवस पान्डुरंगा
आठवीण पाय हा माझा नवस
ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स – Jya Sukha Karne Dev Vedavla Abhang Lyrics
ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||
नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण नारायण
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स – Bhakti Wachuni Muktichi Maj Jadali re Vyadhi Abhang
भक्ती वाचून मुक्तीची
मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||
ज्ञानेशाचे अमृत अनुभव,
अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव,
विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||
संत तुक्याची अभंगवाणी,
इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी,
करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||
सरले शिश्नाव स्वच्छंदीपण,
नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन,
तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||
विठ्ठलाच्या पायी वीट अभंग लिरिक्स – vitthalachya payi veet Abhang Lyrics
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी
अनाथांचा नाथ हरी असे दयावंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
कुठली ती होती माती कोण तो कुंभार
घडविता उभा राही पहा विश्वंभर
तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पाहुनिया विटेवरती विठू भगवंत
दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत
गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स – Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।
देव बाजारचा… ….॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा………॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा… ……॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी – ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वा
देव बाजारचा……….॥४॥
विठ्ठल विठ्ठल लिरिक्स – Vitthal Vitthal Lyrics
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा,
मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या,
पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान,
जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत
भाबड्या लेकरांचा लळा
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
Vitthalache Abhang Marathi lyrics
Pingback: Radhe Radhe Lyrics – Hansraj Raghuwanshi – bhakti.lyrics-in-hindi.com